MMRC Tree Planting | संपूर्ण मुंबईत 24 हजार झाडं लावली, एमएमआरसीचा दावा | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एमएमआरसी अर्थात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मुंबईत 24 हजार झाडं लावल्याचा दावा एका ट्विटमधून केलाय. या ट्विटद्वारे एमएमआरसीने एक व्हिडीओ शेअर केलाय. आरे दुग्ध वसाहत, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ओसाड परिसरात झाडं लावल्याची माहिती देण्यात आलीय. बेहेडा, कदंब, करंज प्रजातीची झाडं दोन वर्षांपूर्वी लावण्यात आली आणि आता ती 15 फुटांपर्यंत वाढल्याचा दावाही करण्यात आलाय. आरेमधील कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलंय.