मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या फाईल्स गहाळ, आ. रमेश कदमांच्या भावाचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स लंपास झाल्याची शक्यता आहे. कारण महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या फाईल्स साठे महामंडळ घोटाळ्याच्या आहेत की इतर हे कळू शकलं नाही.
सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही 4 मजली इमारत असून त्याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळते आहे.
घोटाळ्याशी संबंधित सर्व फाईल्स आणि रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले होते. तरी, फाईल्स लंपास करणाऱ्यांमध्ये घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचा भाऊ असल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे घोटळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.