मुंबई : मिरारोड, भिवंडीच्या मंदिरातील चोरीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Continues below advertisement
मुंबईतल्या मिरारोड येथील गणपती मंदिरात मंगळवारी सकाळी चोरट्यांनी दानपेटी फोडून 2 लाखांची चोरी केली. चोरीची ही दृश्यं मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहेत. सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे पोलिस चोरांचा शोध घेत आहेत. तर तिकडे भिवंडीतही साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न झाला. भिवंडी शहरातल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील हे मंदीर आहे. मात्र चोरट्यांना ही दानपेटी मंदिराच्या आवारा बाहेर नेता आली नाही. त्यामुळे दानपेटी पळवण्याचा चोरांचा हा प्रयत्न फसला. दुसऱ्या दिवशी चोरीची ही बाब मंदिराच्या ट्रस्टिंना लक्षात आली. मात्र याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram