सांगली : ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा

मतदानासाठी ईव्हीएम गुजरातवरुन सांगलीत दाखल, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर टाकणाऱ्या युझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सांगली महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात चालू आहे. या प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. मात्र यातच काही गैरप्रकारही समोर येत आहे. मात्र प्रशासनाकडून यावर नजर ठेवली जात आहे. व्हॉट्सअॅपवर खोटा मेसेज टाकल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसात एकाविरुद्ध तक्रार दिली गेली. मिरजेतील एका व्हाट्सअॅप ग्रुपवर महापालिका निवडणुकीसाठी गुजरातमधूज ईव्हीएम यंत्र आल्याची पोस्ट टाकण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola