ठाणे : मराठी पाट्यांवरुन मनसेपाठोपाठ आता शिवसेना आक्रमक, इंग्रजी पाट्यांना काळं फासलं
Continues below advertisement
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय़. सेनेनं आज मिरारोडमध्ये इंग्रजी पाट्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी इंग्रजी भाषेतील पाट्यांना काळं फासण्यात आलं. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मराठी पाट्या संदर्भात ३० जुलै ही डेडलाईन दिली होती. ही मुदत उलटून गेल्यानंतरही काही दुकानदारांनी आपल्या दुकानावरच्या पाट्या बदलल्या नाहीत. त्यामुळं शिवसेनेनं हे आंदोलन छेडलंय.
Continues below advertisement