Mira Bhayandar | मीरा-भाईंदर महापालिकेत बाळासाहेब ठाकरे कला दालनावरुन शिवसेना-भाजप नगरसेवक आमने-सामने

Continues below advertisement

मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मीरा-भाईंदर महापालिकेत मंगळवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची ही कदाचित शेवटची बैठक असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचा विषय पटलावर घ्यावा, अशी शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी होती. मात्र महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram