नवी दिल्ली : चक्क संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक, चिनी हॅकर्सवर संशय
Continues below advertisement
भारताच्या संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संरक्षण खात्याची वेटसाईट आज ओपन होत नव्हती आणि त्यावर एक चीनी प्रकारचे एक चिन्ह दिसत होतं. त्यामुळे चिनी हॅकर्सनी ही वेबसाईट हॅक केल्याचा संयश व्यक्त केला जात आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनीही वेबसाईट हॅक झाल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, वेबसाईट लवकरच पूर्ववत होईल असंही त्या म्हणाल्या. आणि भविष्यात असं कधीही होऊ नये यासाठी उपाययोजना आखण्यात येतील असंही सितारामन यांनी सांगितलं.
Continues below advertisement