मुंबईकरांसाठी खुशखबर, यंदाच्या सोडतीत म्हाडाच्या घरांची संख्या जास्त
Continues below advertisement
यंदा म्हाडाच्या घरांची संख्या जास्त असणार आहे. मागील वर्षी घरांची संख्या कमी आणि अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी एकही घर नसल्याने म्हाडावर टीका झाली होती. त्यामुळे यंदा घरांची संख्या वाढवण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 400, मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरं उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मानखुर्दमध्ये 100 तर, अॅन्टॉप हिलमध्ये 300 घरे राखून ठेवण्याची म्हाडाची तयारी आहे. मुंबईत घरांच्या किंमती पाहता सर्वसामान्यांना 'म्हाडा'च्या घरांचा मोठा आधार आहे. पण, अनेक कारणांमुळे 'म्हाडा'च्या घरांची संख्या कमी होत आहे. मागील वर्षाच्या लॉटरीत 819 घरांचा समावेश होता.
Continues below advertisement