कोलकाता : मालवाहू जहाजातील 60 कंटेनरला समुद्रात आग, 11 जणांना वाचवण्यात यश
Continues below advertisement
एमव्ही एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला समुद्रात आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर हे विमान कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी रवाना केलं आहे.
पश्चिम बंगालच्या हल्दियापासून सुमारे 60 नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज होतं. जहाजाच्या डेकवर बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कंटेनरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली.
आतापर्यंत या जहाजावरच्या 22 क्रू मेंबरपैकी 11 क्रू मेंबर्सना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे. इतर क्रू मेंबरना वाचवण्याचे तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरु आहेत.