मुंबई : मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'ची पहिली विजेती
Continues below advertisement
अभिनेत्री मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची विजेती ठरली आहे. मराठी बिग बॉसच्या विजेतेपदाचं मुकुट कुणाच्या डोक्यावर चढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर मेघा धाडेने आपणच बिग बॉसच्या घरात ‘बॉस’ असल्याचे दाखवून दिले आहे. तर अभिनेता पुष्कर जोग बिग बॉसचा उपविजेता ठरला आहे. मेघा धाडेसह पुष्कर जोग, सई लोकुर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे हे टॉप-6 मध्ये होते. मात्र एक-एक करत तेही घराबाहेर पडले. त्यानंतर केवळ पुष्कर जोग आणि मेघा धाडे टॉप-2 होते. त्यातील अभिनेता पुष्कर जोग स्पर्धेतील रनर अप ठरला आणि मेघा विजेती ठरली.
Continues below advertisement