मुंबई : 'मराठी बिग बॉस'च्या घरात कोण जाणार?
Continues below advertisement
बिग बॉस…भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातला सगळ्यात वादग्रस्त शो…हाच शो आता मराठीत येत आहे. महेश मांजरेकर बिग बॉसच्या भूमिकेत आहेत, हे आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
या घरात जाणारी पहिल्या स्पर्धक आहेत उषा नाडकर्णी… उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी जरा जास्तच प्रसिद्ध आहेत. जे मनात तेच तोंडात असा त्यांचा स्वभाव कधी कधी इतरांना चांगलाच अडचणीत आणतो. त्यांच्या असण्याने घरातलं वातावरण गरम राहाणार यात शंका नाही.
या यादीतलं दुसरं नाव आहे अभिनेता राजेश श्रृंगारपुरे. राजेश नुकताच डॅडी या बॉलिवूडपटात झळकला होता. त्याच्या कामाचं कौतुकही झालं होतं. हाच राजेश बिग बॉसच्या घरात काय करामत करतोय ते लवकरच कळेल.