मुंबई : माटुंगा सर्कल भागात मॅनहोलचं झाकण उघडंच, पालिकेचं दुर्लक्ष
Continues below advertisement
मुंबईमधल्या पावसाळ्यातल्या दुर्घटनांनंतरही महापालिकेनं कोणताही धड़ा घेतलेला दिसत नाही..गेल्या वर्षी उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ.दीपक अमरापूरकर यांचा नाहक बळी गेला...मात्र कालच्या पावसातही मॅनहोलची अवस्था पुन्हा समोर आलीय...माटुंगा सर्कल भागात पावसामुळे झाकण उघडं झालं...आणि जवळपास दोन तास हे झाकण उघडं असल्यानं दुर्घटना टाळण्यासाठी जवळच्या गार्डनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली... आपलं काम सोडून कर्मचाऱ्यांनी मॅनहोलच्या कडेनं गाड्या लावल्या..पालिका कर्मचाऱ्यांची वाटही पाहिली मात्र शेवटी कर्मचाऱ्यांनी स्वतच झाकण लावून टाकलं... त्यामुळे जीव गेल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न विचारला जातोय.
Continues below advertisement