अमेरिका : वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार, पाच जणांचा मृत्यू
Continues below advertisement
अमेरिकेतील अनापोलिस येथील इमारतीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मेरिलँडमधील अनापोलिस येथील कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या कार्यालयात हा गोळीबार झाला. वृत्तपत्राने विरोधात बातमी छापल्याने हा गोळीबार झाला. याप्रकरणी एकाला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे.
Continues below advertisement