पुणे : अहमदनगरमधील 'ते' पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे
Continues below advertisement
अहमदनगरमधल्या कुरियर कार्यालयात ज्या पार्सलचा स्फोट झाला, ते पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे होतं., अशी माहिती आता पुढे येतेय. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे पुण्याहून पोलिसांचं एक पथक तातडीनं नगरला रवाना झालं आहे. नगरच्या मारुती कुरिअर कार्यालयात कर्मचारी कुरिअर फोडायचं काम करत होते. मात्र त्यातील एक पार्सल फोडत असताना त्याचा अचानक स्फोट झाला. या पार्सलमध्ये असणाऱ्या स्पीकरच्या पाईपमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती. स्फोट झाल्यानंतर हे पाईपचे तुकडे संजय क्षीरसागर या कर्मचाऱ्याच्या हातात आणि पायात घुसले. सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अहमदनगरहून हे पार्सल पुण्याला पाठवलं जात होतं. मात्र यावर पाठवणाऱ्याचा पत्ता बनावट असल्याचं समजतं आहे. त्यामुळं पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीसोबत घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement