मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग

Continues below advertisement

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाला. अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. लॉस एंजेलिसवरुन मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला.

हा प्रवासी वारंवार अश्लील संभाषण करुन रॅन्डी झुकरबर्गला त्रास देत होता. इतकंच नाही तर रॅन्डी आणि इतर महिला प्रवाशांबद्दल अश्लील कमेंट्स करत होता. सोबतच मद्यपानही करत होता.

रॅन्डीने याबाबतची तक्रार विमानातील कर्मचाऱ्यांना केली असता त्यांनी रॅन्डीलाच सीट बदलून देण्याची ऑफर दिली. “माझाच विनयभंग होत असताना, मीच का माझी सीट सोडून जायचं असा विचार माझ्या डोक्यात आला,” असं रॅन्डी म्हणाल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram