औरंगाबाद : येत्या 48 तासात मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि बीड या सहा जिल्ह्यांत येत्या 48 तासात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.... हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय...त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी... आणि शेती मालाचं नुकसान होणार नाही याच्या उपाययोजना कराव्यात...