Marathi Compulsion | 'मराठी सक्तीचा कायदा करा' मराठी साहित्यिकांचं आझाद मैदानावर आंदोलन | मुंबई | ABP Majha
राज्यात मराठी भाषा टिकावी, मराठी शाळा टिकाव्यात आणि त्यांचं सक्षमीकरण व्हावं, यासह विविध मागण्यांसाठी आज मराठीतील दिग्गज साहित्यिक, शिक्षक, पालक आदींनी आझाद मैदानावर आंदोलन केलं. सरकारनं यापूर्वीच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पाऊलं उचलली असती तर ही वेळ आलीच नसती, असं मत या आंदोलकांनी व्यक्त केलं.