राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन
Continues below advertisement
राज्यात विविध ठिकामी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलक ठिय्या मांडून बसले आहेत. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका गावात आज आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. तिकडे नाशिकच्या पाथर्डी परिसरातही आरक्षणाच्या मागणीसाठी भजन आंदोलन करण्यात येतंय. सरकारला सुबुद्धी मिळावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात येतेय. आंदोलकांची संख्या वाढल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. तिकडे परळीतही सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन चालू आहे.
Continues below advertisement