मराठा आंदोलन :नाशिक: येवला शहरात मराठा कार्यकर्त्यांची रॅली
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील येवल्यातही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येवला शहरातून रॅली काढली. शिवाय शहरातल्या विंचुर चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन सुरु केलं. तर मनमाड-शिर्डी मार्गावरही कार्यकर्त्यांचा रस्तारोको सुरु आहे.
Continues below advertisement