मराठा मोर्चा : ठाण्यात आंदोलकांना शांत करत पोलिसांनी महामार्ग मोकळा केला
सकाळपासून ठाणं आंदोलनामुळे धगधगत होतं.. मात्र मराठा समन्वयकांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर करताच ठाण्यात परिस्थिती चिघळली... ठाण्यातल्या नितीन कंपनी परिसरात आंदोलकांनी दगडफेक केली,.. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करताना लाठीचार्ज केला... सकाळी आंदोलकांनी जाळपोळ केली.. बसेसचीही तोड़फोड़ करण्यात आली.. शिवाय लोकल थांबवून ट्रान्स हार्बर मार्गही ठप्प केला...