मराठा मोर्चा : ठाणे शहरातील आंदोलन पेटवण्यामागे समाजकंटक, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा
Continues below advertisement
मराठा समाजाच्या आंदोलनात समाजकंटकांनी घुसून आंदोलन पेटवल्याचा दावा ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी 20 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय आणखी काही संशयीतांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. आंदोलन पेटवल्याच्या प्रयत्न केल्याबद्दल या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिवसभर पोलिसांना सहकार्य करत आंदोलन शांततेच्या मार्गानं केलं. दुपारनंतर मुंबई बंद स्थगित झाल्याची घोषणा झाल्यानंतर काही समाजकटंकांनी तोडफोड करण्यात सुरुवात केली, तसेच पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केलं. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. तसेच आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 समाजकटंकांना अटक केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली.
Continues below advertisement