मराठा मोर्चा : सातारा : शिवेंद्रराजेंना मोर्चेकऱ्यांनी भाषणापासून रोखलं

Continues below advertisement
साताऱ्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. साताऱ्यात विराट मोर्चा काढण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे मोर्चादरम्यान आमदार शिवेंद्रराजेंनी भाषण सुरु केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत त्यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे शिवेंद्रराजे, आमदार शशिकांत शिंदे यांना मागे परतावं लागलं. राजवाडा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाबरोबरच अनेक आमदार यात सहभागी झाले होते. मात्र फक्त सहभाग घ्या, भाषण करु देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram