मराठा आंदोलन : मुबई-पुणे महामार्गावर चाकण फाट्यावर ठिय्या
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यातल्या अनेक ठिकाणी बंद पाळला जातोय. कुठे रस्ता रोको होतोय तर कुठे रॅली काढली जातेय. पुण्यातल्या तळेगाव येथे मराठा मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चाकण फाट्यावर आंदोलकांनी अर्ध्या तासापासून ठिय्या मांडलाय. पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतूक वळवल्यानं मुंबई-पुणे महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी टळली आहे.
Continues below advertisement