मराठा मोर्चा : नवी मुंबई : मराठा आंदोलनात अनोळखी चेहरे घुसल्याचा संशय : आमदार नरेंद्र पाटील

Continues below advertisement
नवी मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये काही अनोळखी चेहरे घुसल्याची शंका मराठा नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना पाटील यांनी या आंदोलनात उपरे आंदोलक घुसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आंदोलन पेटवण्यासाठी भाडोत्री माणसे पाठवली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. ठरल्याप्रमाणे एकदिवसीय बंद जाहीर करण्यात आला होता. बंद यशस्वी झाला, त्यामुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला वेळ द्यायला हवा असं आवाहन त्यांना आंदोलनकर्त्यांना केलं. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका आंदोलनातील नवीन चेहऱ्यांनी घेतली, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. सरकार मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण नाराज असून ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असंही आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram