मराठा मोर्चा : मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा : अशोक चव्हाण
Continues below advertisement
मराठा आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असून त्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. आता आरक्षणाबाबत चर्चा नको, तर कृती हवी असंही अशोक चव्हाण म्हणाले. ‘आजवर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली आहेत. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही, ’ असं म्हणत अशोक चव्हाणांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
Continues below advertisement