मुंबई बंद : मराठा मोर्चा : सकाळच्या वेळेला मुंबई बंदची परिस्थिती
मराठा मोर्चाकडून आज मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. काल मुंबईत मराठा मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली. बंदवेळी कुठल्याही प्रकारची हिंसा करु नका असं आवाहन करायलाही मोर्चाचे समन्वयक विसरले नाहीत. तसंच बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही, याची काळजी घेण्यासही मोर्चाकडून बजावण्यात आलं आहे. दरम्यान, आजच्या मुंबई बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दर्शविलाय..दरम्यान आजच्या बंदमधून शाळांना वगळण्यात आलं आहे.