मुंबई बंद: मराठा मोर्चा - अपडेट- सकाळी आठ वाजता

Continues below advertisement
नवी मुंबई, रायग़ड, पालघऱ बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत काही भागात रस्त्यांवर वाहनं दिसत नाहीयत. तर काही भागात जनजीवन सुरळीत आहे. बाजारपेठ सुरळीत सुरु असली तरी भाज्यांची आवक मात्र घटली आहे. सकाळच्या सत्रातल्या शाळाही नियमित सुरु असल्याचं दिसतंय. या बंदमधून शाळा, रुग्णालयं अशी आस्थापनं वगळण्यात आली आहेत. दरम्यान, बंदवेळी कुठल्याही प्रकारची हिंसा करु नका असं आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केलंय. तसंच बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही, याची काळजी घेण्यासही मोर्चाकडून बजावण्यात आलं आहे. आम्ही देखील मराठा समाजाच्या बांधवांना शांततेचं आवाहन करत आहोत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram