मुंबई बंद : मराठा मोर्चा : मुलुंड टोलनाक्यावर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीनं मुंबईत ठिकठिकाणी आदोलन करण्यात येतंय. घाटकोपरच्या भटवाडी परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे..दुकानदार, भाजीवाल्यांना आंदोलकांकडून दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात येतंय..आंदोलकांनी बेस्टच्या बसेसही काही ठिकाणी अडवल्या आहेत.. मुलुंडमध्येही आंदोलक आक्रमक झाले आहेत..मुलुंड टोलनाक्यावर चक्का जाम करण्याच्या तयारीत कार्यकर्ते आहेत. जोगेश्वरीतही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.