मुंबई बंद : मराठा मोर्चा : अंधेरी स्टेशन परिसरात आंदोलकांची गर्दी
सकल मराठा मोर्चाच्या वतीने आज मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, नाशिक, रायगड, पालघर बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत हळूहळू या बंदचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईला नवी मुंबई, पुणे आणि गोव्याशी जोडणारा सायन-पनवेल महामार्ग आंदोलकांनी रोखला आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा होतोय.