मराठा आंदोलन : जालना : संतप्त जमावाकडून जोळपोळआणि तोडफोड
जालना जिल्ह्यातील बदनापूर इथं मराठा आरक्षणाच्या चक्का जाम आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, जालना ते औरंगाबाद रोडवर आज सकाळी मराठा मोर्चाचा रस्ता रोको सुरू होता यावेळी काही आंदोलकांनी टायर जाळून रस्ता आडवून धरला. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर अचानक रस्त्यावर दगडफेक सुरू झाली. अपुऱ्या पोलीस बळामुळे आंदोलक आक्रमक झाले आणि रस्त्यावरच्या वाहनांची तोडफोड करू लागले. यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झालीय.