नाशिक: टोमॅटोचे भाव घसरले, 20 किलोच्या कॅरेटला 100 रुपयेही मिळेना
सध्या टोमॅटोचे दर अत्यंत घसरल्य़ानं शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडलीय.. याचाच परिणाम, मनमाडमधील शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी कृरुन ते गुरांना खायला घातलेत.. टोमॅटोचा दर्जा चांगला असला तरी टोमॅटोला म्हणावा इतका भाव मिळत नाही.. 20 किलोंच्या कॅरेटला साधे शंभर रुपयेही मिळत नसल्यानं बळीराजावर ही वेळ आलीय.. काढणीसाठी लागणारी मजुरी, वाहतुकीचा खर्च वसूल होत नसल्यानं बळीराजावर शेतातले लालसर टोमॅटो एकतर फेकून द्या किंवा गुरांना खाऊ घाला, इतकेच पर्याय उरल्याचं शेतकरी सांगतायत.