चंद्रपूर | दोन वर्षीय चिमुकल्याचा गुप्तधनासाठी बळी दिल्याचं उघड
चंद्रपुरातील युग मेश्राम हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय. गुप्तधनाच्या लालसेने युगचा नरबळी दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. युगच्या डोक्यावर तीन भोवरे असल्याने गुप्तधनासाठी सुनिल आणि प्रमोद बनकर या तांत्रिकांनी त्याचा बळी दिला. हत्येपूर्वी त्यांनी युगची पुजा देखील केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.दोन्ही तांत्रिक युगच्या घराशेजारीच राहत होते. त्यांनी अपहरण करुन पुजा करत युगची हत्या केल्याचं समोर आलं आहे. ईदच्या दिवशी युग घराजवळून बेपत्ता झाला. त्यानंतर बुधवारी घराशेजारील तनसाच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह आढळला होता.