मुंबई : मानखुर्दमध्ये तडा गेलेल्या रुळाला फडकं बांधून लोकल रवाना, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
मानखुर्द आणि गोवंडी दरम्यान रेल्वे ट्रॅकला गेलेल्या तड्यांवर उपाय म्हणून रुळांना चक्क फडक्याने बांधल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने यावर पावलं टाकत दुरुस्तीही सुरु केली. धक्कादायक गोष्ट ही...की त्याआधी फडकं बांधलेल्या अवस्थेत त्या रुळांवरुन लोकल धावलीही.....एका लोकलमध्ये एका वेळी हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्या जीवाचं रेल्वेला काहीच सोयरसुतक नाही का ? ही जीवघेणी आयडिया कोणाची ? असे जीवावर बेतणारे उपाय करणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही ? रेल्वे सेवा सुरु करण्याची घाई समजू शकतो, पण प्रवाश्यांच्या जीवावर बेतणारा हा अघोरी उपाय का केला गेला, याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.