EXCLUSIVE : मुंबई : मानखुर्दमध्ये तुटलेल्या रुळाला फडका बांधून लोकल नेण्याचा प्रताप
रेल्वे प्रशासनाने लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या जीवाशी कसा अक्षम्य खेळ केला आहे, याचं उदाहरण समोर आलं आहे. तुटलेल्या रुळाला फडका बांधून त्यावरुन लोकल नेण्याचा प्रताप रेल्वे अधिकाऱ्यांनी केला.
हार्बर रेल्वेवर मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि रुळाचा तुकडा पडला. मात्र या तड्यांवर उपाय म्हणून रुळांना चक्क फडका बांधल्याचं समोर आलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे अशा अवस्थेत त्या रुळांवरुन लोकल धावली. त्यामुळे रेल्वे सेवा सुरु ठेवण्यासाठी लोकल प्रशासनाने शेकडो मुंबईकरांचा जीव धोक्यात का घातला असा प्रश्न आहे.