शिर्डी : कोपरगावजवळच्या मंजूर गावात गोदावरी नदीवरील बंधारा वाहून गेला, शेतीचं नुकसान

Continues below advertisement
परतीच्या पावसामुळं अहमदनगरच्या मंजूर गावातील गोदावरी नदीवरच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. कोपरगाव तालुक्यातील मंजूरमध्ये गोदावरी नदीवर कोल्हापूर प्रकारचा बंधारा आहे. सध्या नाशिकमध्ये सुरु असलेल्या पावसामुळं गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाण्याचा जोर वाढल्यानं या बंधाऱ्याच्या उजव्या बाजूला असलेला मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळं गोदावरीचं पाणी परिसातील शेतीत घुसल्यानं मोठं नुकसान झालं. शेतातील मका, बाजरी, सोयाबीन आणि ऊस ही पीकं अक्षरश: वाहून गेली आहेत. तसेच हा भराव वाहून नदीपलीकडेच्या गावात ये-जा करण्याचाही मार्ग बंद झाला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वीही अशाच प्रकार हा बंधारा वाहून गेला होता. त्यामुळं आता येथे मातीचा न टाकता सिमेंट बांधकाम करण्याची मागणी नागरिकांककडून केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram