स्पेशल रिपोर्ट : रायगड : चिमुकल्या दियाची हत्या संपत्तीसाठी की राजकीय वादातून?

Continues below advertisement
चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिया जाईलकर असं या चिमुकलीचं नाव आहे.

ती घरगुती साहित्य आणण्यासाठी दुकानावर गेली होती, त्यानंतर ती घरीच परतली नव्हती. चार दिवसांनी गावातीलच एका बंद घरात तिचा मृतदेह आढळला आहे.

राजकीय वैमनस्यातून चिमुकलीची हत्या झाल्याचा संशय आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून दिया जाईलकर ही 7 वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती.

दिया जाईलकर ही माणगाव तालुक्यातील वावे गावात राहात होती. ती शुक्रवारी संध्याकाळी गावातील दुकानावर सामान खरेदी करायला गेली होती. मात्र ती घरी परतलीच नाही.

बराच वेळ दिया घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली. पण दिया सापडली नाही. यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने दिया बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास गावातील एका बंद घरात दिया हिचा मृतदेह आढळून आला. यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली.

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दियाच्या हत्येचं नेमकं कारण काय? हा एकच प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram