रायगड : 7 वर्षीय दियाची हत्या, ग्रामस्थांकडून मारेकऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
Continues below advertisement
चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिया जाईलकर असं या चिमुकलीचं नाव आहे. ती घरगुती साहित्य आणण्यासाठी दुकानावर गेली होती, त्यानंतर ती घरीच परतली नव्हती. चार दिवसांनी गावातीलच एका बंद घरात तिचा मृतदेह आढळला आहे. ग्रामस्थांकडून मारेकऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करुन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
Continues below advertisement