मुंबई : सचिन तेंडुलकरच्या मुलीला त्रास देणाऱ्या माथेफिरुला अटक
Continues below advertisement
सचिन तेंडुलकरची मुलगी साराला सतत फोन करुन त्रास देणाऱ्या माथेफिरु तरुणाला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. याबाबतची तक्रार नुकतीच सचिनने मुंबई पोलीसात दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी सदर इसमाला पश्चिम बंगालच्या महिसादल येथून अटक केली. देवकुमार मिद्दी असं व्यक्तीचं नाव आहे. संबंधित व्यक्ती सचिनच्या मुंबईतील ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Continues below advertisement