पंढरपूर : रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण

Continues below advertisement
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग...
असं म्हणत आज ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा रिंगण सोहळा पार पडला...
ज्ञानेश्वर माऊलींचं रिंगण माळशिरजमध्ये पार पडलं,
तर संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजमध्ये संपन्न झाला.
या उभ्या रिंगण सोहळ्यासाठी अवघ्या वैष्णवांचा मेळा जमला होता. वारकऱ्यांनी भजनं किर्तनं गायली...
तर काहींनी मृदुंगाच्या तालावर ठेका धरला.
कुणी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन रिंगणात सहभागी झाले तर कुणी रांगोळ्यांच्या पायघड्यांवरून धावणाऱ्या मानाच्या अश्वामागे धावले... रिंगण सोहळा हा या पालखी टप्प्यातला एक आनंदसोहळा ठरतो... वेगवेगळी माणसं एकत्र येतात आणि अवघा वैष्णवांचा मेळा जमतो.... जाणून घेऊयात रिंगण सोहळ्यातील खास अनुभव वारकऱ्यांकडूनच...
पाहुयात माझा विठ्ठल, माझी वारी..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram