सोलापूर : वारीत वापरलेल्या पत्रावळींच्या कंपोस्ट खताचं वाटप
Continues below advertisement
पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात वापरलेल्या पत्रावळींचं कंपोस्ट खत माळशिरसच्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलं. लाखो भाविक पंढरपूरच्या वारीमध्ये थर्माकोल आणि प्लास्टिकच्या पत्रावळींचा वापर करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत होतं. यावर मार्ग काढत गो विज्ञान संशोधन संस्था, थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंच आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानं वारीत नैसर्गिक पत्रावळ्यांचं वाटप करण्यात आलं होतं. त्यातील 25 लाख पत्रावळी या संस्थांनी पुन्हा एकत्र करून कंपोस्ट खत तयार केलं.
Continues below advertisement