मुंबई : मालाडमध्ये वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गाडीच्या इंजिनाला आग
Continues below advertisement
मालाडच्या पुष्पा पार्क परिसरात काल रात्रीच्या सुमारास कार पेटल्याचा थरार अनुभवायला मिळाला. अंधेरीवरुन बोरीवलीकडे ही स्विफ्ट डिझायर कार जात असताना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा अपघात घडला. पुष्पा पार्क जवळ पोहोचताच गाडीच्या इंजिनमध्ये भीषण आग लागली. यामध्य़े कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गाडी जळून खाक झाली आहे.
Continues below advertisement