Malad Wall Collapse | मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून 16 रहिवाशांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 16 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्यादरम्यान चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.