मुंबई : मौज-मजा जीवावर, रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू, एकाला शॉक
Continues below advertisement
मौज-मस्ती हा आयुष्याचा भाग आहे.. आणि ती करावी,... पण ती करत असताना थोडं जागेचं भान ठेवलं तर जीवावर बेतणार नाही... हे सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांतल्या वाढत्या घटना...
मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल मरणाचं साधन असल्याप्रमाणे नागरिक तिचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कारण, मालाडमध्ये लोकलसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याचा एक व्हीडिओ समोर आलाय. तर तिकडे दिव्यात फाटक बंद असतानाही त्याखालून दुचाकी घालण्याचा प्रयत्नात एक्सप्रेसनं धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. तर कल्याणमध्ये एका तरुणाचा सेल्फीचा मोह जीवावर बेतला.. पण सुदैवानं तो बचावला आणि त्याच्यावर उपचार सुरु आहेत...