माझा विठ्ठल माझी वारी : ज्ञानोबा-तुकोबांची पालखी पुणे मुक्कामी
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुणे मुक्कामी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात तर तुकोबांच्या पालखीने नाना पेठेतल्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम घेतल्या. पुणे शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक पालखी दर्शनाला येतात. आज दिवसभर दोन्ही पालख्यांच्या ठिकाणी भाविकांची मांदियाळी दिसेल. काल दोन्ही पालख्यांचा संगम सोहळा पुणे शहरात पार पडला. या अद्भूत संगम सोहळ्यासाठी लाखो वारकरी उपस्थित होते.