माझा विशेष : नगरचा नरक कुणी केला?
Continues below advertisement
अहमदनगर जिल्हा.. एकही काना मात्रा नसलेलं नाव.. सहकाराची पंढरी.. दिग्गज नेत्यांची खाण अशी बहुढंगी ओळख असलेल्या नगरमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते सामान्यांना हादरवणारं आहे.. राजकीय आखाड्यात दिवसाढवळ्या खून होणं हे बिहामध्ये नॉर्मल असलं तरी आपल्याला सवयीचं नाही... आणि पुरोगामी महाराष्ट्राला ते भूषावह सुद्धा नाही.. मात्र या सहकाराच्या पंढरीत अहमदनगरमध्ये हे घडलं .. अगदी दिवसा उजेडी खून झाले.. बरं त्यापुढची कडी म्हणजे तिथल्या मातब्बर नेत्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं म्हणून बबंद झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसअधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली.. अहमदनगर मध्ये असं काही होतंय हेच मुळात आश्चर्यकारक आहे.. नगरचा नरक कुणी केलाय.. आणि राजकीय अंगरख्यात वावारणार्या गावगुंडांना अभय कोणाचं आहे.. तोडफोड होताना पोलिस आणि प्रशासन मूग गिळून गप्प कसं बसलं.
Continues below advertisement