VIDEO | राजच्या 'पोपट'पंचीमागे 'पवार'फूल राजकारण? | माझा विशेष | एबीपी माझा
आज जागतिक चिमणी दिवस.. मात्र चिमणी दिनाला चिमण्यांची नव्हे तर एका वेगळ्या पक्षाची चर्चा सध्या सुरु आहे. पोपट, कुणी म्हणतं हा बारामतीचा पोपट तर कुणी म्हणतंय, की हा पोपट पाकिस्तानचा.. तो पोपट आहे कुठला याविषयी चर्चा होईल, मात्र हा पोपट राजकीय आहे, एवढं नक्की.. निवडणुकीच्या धामधूमीत आघाडी, पिछाडी होत असताना मनसेच्या भूमिकेकडे अनेकांचे डोळे होते. त्यातच राज ठाकरे-आणि शरद पवार यांची जवळीक वेगळ्या राजकीय चर्चाना हवा देत आहे. यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंवर शेरेबाजी केली, आणि त्यानंतर राजकीय वाक्युद्धाला सुरवात झालेली आहे. रंगशारदात झालेल्या भाषणात राज ठाकरेनी मोदीविरोधी भूमिका स्पष्ट केल्यानंतर हे होणारच होतं.. पण यात प्रश्न असा आहे की 2014 च्या निवडणुकीत मोदींचे गोडवे गाणारे राज ठाकरे मोदीविरोध का करयाला लागले. त्याच्या या भूमिका बदलामागे कोणतं अंस पावार फुल राजकारण आहे.? मोदी-शहा विरोध केल्यानं मनसेचं इंजिन ट्रॅक वर येणार आहे का?..लोकसभा निवडणूक न लढवणे ही मनसेची अपरीहार्यता आहे?