VIDEO | आघाडी होतानाच झोंबाझोंबी सुरु? | माझा विशेष | एबीपी माझा

लोकसभा निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरु झालंय. निवडणुका म्हटल्या की हेवेदावे, नाराजी आलीच. त्यावरच सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. मात्र सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय, ते विखे पुत्राच्या भाजप प्रवेशाने.. सुजय विखे पाटील नगरमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवायला इच्छुक होते.. मात्र ३ वेळा पराभव होऊनही राष्ट्रवादी ही जागा काही काँग्रेसला सोडायला तयार नाही. त्यामुळे सुजय विखेंनी भाजपत प्रवेश केला. मात्र त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांच्याच पक्षातले बाळासाहेब थोरात सरसावले. त्यात बालहट्टवालं विधान करत पवारांनी विखेंच्या जखमेवर मीठ चोळलं. दोघांच्याही पहिल्या याद्या जाहीर झाल्या तरीही काही जागांवर अजूनही चर्चा सुरुच असल्याचंही सांगण्यात आलं. माढा, मावळ, नगरचे उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे वातावरण आणखीन ढवळलंय. एकीकडे एकमेकांवर टोकाची टीका करणाऱ्या सेना-भाजपच्या संयुक्त प्रचारसभाही ठरल्या तर आघाडीत अजूनही डळमळीत स्थिती का पाहायला मिळतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola