माझा विशेष : 11 हजार कोटींचा चुना लागलाच कसा?
Continues below advertisement
तब्बल 11 हजार 360 कोटी रुपयांच्या अफरातफरीनं बाजारातही धुमाकूळ घातलाय. कारण शेअर बाजार उघडताच पीएऩबीचे शेअर्स तब्बल 15 टक्क्यांनी कोसळले आहेत. मुंबईच्या ब्रीच कँडी शाखेतून डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांनी बँकेची आर्थिक फसवणूक केली. हा सगळा प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला. त्यानंतर नीरव मोदीविरोधात 280 कोटी रुपयाच्या अफरातफरीची वेगळी केस दाखल करण्यात आली. मात्र, काल हा सगळा घोटाळा तब्बल 11 हजार 360 कोटीचा असल्याचं समोर आलं. घोटाळ्याची रक्कम पंजाब नॅशनलच्या एकूण भांडवलाच्या एक तृतीयांश इतकी आहे. तर त्यांच्या गेल्या वर्षीच्या नफ्याच्या 10 पट आहे. दरम्यान या घटनेनंतर नीरव मोदी परदेशात पळून गेल्याच्या बातम्या येतायत. यात त्याची पत्नी एमी मोदी आणि निकटवर्तीय मेहुल चोकसीच्या सहभागाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Continues below advertisement