Chennai Water Crisis | चेन्नईची तहान भागवण्यासाठी वेल्लोरहून रेल्वेने पाणी | माझा स्पेशल | ABP Majha

Continues below advertisement
पाणीटंचाईमुळे तहानलेल्या चेन्नईकरांसाठी चक्क रेल्वेनं पाणी आलं आहे. 217 किलोमीटर दूर असलेल्या वेल्लोर जिल्ह्यातून आलेलं पाणी स्वच्छ करुन नागरिकांना पुरवलं जाईल. 50 वॅगन असलेल्या ट्रेनमधून तब्बल 25 लाख लीटर पाणी चेन्नईत आणण्यात आलं. यापूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ट्रेनमध्ये पाणी भरण्यास गुरुवारी रात्री एक वाजता सुरुवात झाली. सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी जोलारपेटमधून निघालेली ट्रेन दुपारच्या सुमारास चेन्नईला पोहचली. प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram