माझा साहित्य संमेलन : संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री अरुणा ढेरे यांची खास मुलाखत
Continues below advertisement
आज जागतिक मराठी भाषा दिवस... श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन... यानिमित्त केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगातील मराठी मंडळी आपल्या बहुपिढी वारशाचा गौरव साजरा करतात. मराठी भाषिकांची पहिली पसंती असलेल्या 'एबीपी माझा'नेही यंदापासून मराठी साहित्य संमेलनाची रुजूवात करतोय. आज दिवसभर चालणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे आहेत. अरुणा ढेरे यांची साहित्यसंपदा कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समिक्षा, अशी विविधांगी आहे. मात्र, त्या मुळात कवयित्री आहेत. माझा साहित्य संमेलनाचा प्रारंभ त्यांच्या मुलाखतीतून करण्यात येत आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी.
Continues below advertisement